कुडाळ : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून मुंबईहून कुडाळपर्यंत ‘शिवसेना एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही विशेष रेल्वेगाडी १२ सप्टेंबर २०२६, शनिवार रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून सुटणार असून कुडाळ रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा, आपल्या गावाकडे जाता यावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
सीट बुकिंगसाठी संपर्क :
📲 ८४२५९०१२०२
📲 ८४२५९०१५४५
बुकिंगची वेळ : सोमवार ते शनिवार, सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
या प्रवासासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रवाशांनी कोणालाही कोणताही मोबदला देऊ नये. तसेच बुकिंग अहस्तांतरणीय असून प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
गणरायाच्या आगमनासोबत टाळ-मृदुंगाचा गजर आणि आपल्या गावच्या मातीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील कोकणवासीयांना पुन्हा एकदा गावाकडे नेण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
“कोकणात जाऊन आपल्या कुटुंबीयांना भेटता यावं आणि गणपती सण साजरा करता यावा, म्हणून आमचा दरवर्षी हा छोटासा प्रयत्न असतो,” असा संदेश आमदार निलेश नारायणराव राणे यांनी दिला आहे.








