कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केलेल्या नामनिर्देशनानुसार भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या नियुक्तीमुळे महिला व बाल रुग्णालयाच्या कारभारावर नियंत्रण राहणार आहे.












