भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनीती बैठक ; ‘सेवा, सुशासन आणि विकासा’चा निर्धार!

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम व प्रभावी करण्यासोबतच जनकल्याणकारी धोरणे आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी काळात संघटनेला अधिक बळकटी देत, ‘सेवा, सुशासन आणि विकास’ या विचाराने प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याने जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस आ.निरंजन डावखरे, आ.योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आ.प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, संदीप गावडे, विशाल परब, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई आदी उपस्थित होते.