बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-2027 अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-2027 अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ दि. 7 जानेवारी ते 13 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

महोत्सवाचे हे 29 वे वर्ष असून या महोत्सवाने महाराष्ट्रभर स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. या महोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली असून, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू आहे.

गेल्या 29 वर्षांत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या महोत्सवात आपली नाटके सादर केली आहेत.

भारतातील कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थांना, मराठी गद्य नाटकांसाठी हा महोत्सव खुला असून या महोत्सवाच्या अंतिम फेरीत एकूण 7 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे.

महोत्सवातील अंतिम फेरीत प्रवेश मिळालेल्या संघास सादरीकरणानंतर रु. 25,000/- एवढी रक्कम निर्मिती सहाय्य म्हणून देण्यात येईल. शिवाय महोत्सवासाठी निवडलेल्या संघांची कुडाळमधील प्रयोग दिवशीची चहा, भोजन, निवास याची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. याबरोबरच सहभागी संघास स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी प्रवेश फी आकारली जात नाही.

इच्छुक संघांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

या स्पर्धेत अंतिम फेरीत एकूण फक्त सात निवडक संघांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी आयोजक संस्थेचे निवड मंडळ सर्व इच्छुक संघांचे नाट्यप्रयोग अगर रंगीत तालीम दि. 14 नोव्हेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पाहून निवड करणार आहेत.

तालीम स्वरूपात प्राथमिक फेरीसाठी निवड झालेल्या संघांना दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्राथमिक फेरीची तारीख व वेळ कळविण्यात येईल.

अंतिम फेरीत निवड झालेल्या संघांना दि. 01 डिसेंबर 2026 पर्यंत प्रवेशाबाबत कळविण्यात येईल.

स्पर्धेसाठी असलेली पारितोषिके

संघाकरिता पारितोषिके

  1. पहिले पारितोषिक – रु. 50,000/- प्रमाणपत्र व फिरता चषक
  2. दुसरे पारितोषिक – रु. 30,000/- प्रमाणपत्र व फिरता चषक
  3. तिसरे पारितोषिक – रु. 20,000/- प्रमाणपत्र व फिरता चषक

दिग्दर्शकाकरिता पारितोषिके

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

संगीताकरिता पारितोषिके

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

उत्कृष्ट प्रकाश योजना पारितोषिके

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

उत्कृष्ट नेपथ्य पारितोषिके

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

वैयक्तिक अभिनयाकरिता पारितोषिके (पुरुष कलाकार)

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

वैयक्तिक अभिनयाकरिता पारितोषिके (स्त्री कलाकार)

  1. पहिले पारितोषिक – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  2. दुसरे पारितोषिक – रु. 700/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
  3. तिसरे पारितोषिक – रु. 500/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

सर्वोत्कृष्ट रंगभूषा – रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

उत्तम व्यवस्थापीत संघ – पारितोषिक रु. 1,000/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

पडद्यामागे शिस्तबद्ध वर्तन व उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या संघासाठी आयोजक संस्थेतर्फे खास पारितोषिक रु. 1,000/- व प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाईल. परीक्षक मंडळ यांचे परीक्षण अगर शिफारस करणार नाही. आयोजक संस्थेच्या कार्यकर्त्यांना संघाची शिस्त व व्यवस्थापन प्रभावी वाटले तरच हे पारितोषिक दिले जाईल.

इच्छुक संघांनी स्पर्धेची नियमावली, माहितीपत्रक व प्रवेश अर्जासाठी कार्यवाह, नाट्यमहोत्सव आयोजन समिती, बाबा वर्दम थिएटर्स, द्वारा- श्री. आनंद वैद्य, ‘निलेंदू’, ॲक्सिस बँकेच्या मागे, कुडाळ-416520, जि. सिंधुदुर्ग. मोबाईल क्र. 8275390909 यांचेशी संपर्क साधावा किंवा bvtkudal53@rediffmail.com या पत्त्यावर e-mail पाठवावा.

कुडाळ
दिनांक : 01/10/2026

(विजय अनंत वैद्य)
अध्यक्ष
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ