सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामकृष्णजी वेताळ यांच्या आदेशानुसार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. उमेशजी सावंत यांनी श्री. रामचंद्र (अजय) गोविंद सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
या नव्या जबाबदारीनिमित्त आज श्री. रामचंद्र सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडत संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !











