संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – कुडाळ : केंद्र शासनाच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान अंतर्गत न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने अंतर्गत ओरोस न्यू इंग्लिश स्कूल परिसरात वृक्षारोपण उपक्रम पार पडला.
स्कूलच्या परिसरात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, उद्योजक संतोष वालावलकर तसेच ओरोस ग्रामपंचायत सदस्या राजश्री नाईक, भक्ती पळसंबकर, वनिता जुवेकर, संस्थेचे अध्यक्ष बेंजामिन गोम्स यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. तृप्ती धोडमिसे यांनी न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्टच्या पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक केले. ‘प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे’ असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन राजन भगत यांनी केले. यावेळी नागरिक, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.











