हुमरमळा प्रीमियर लीग 2026 चे थाटात उद्घाटन; छोट्या स्पर्धेचे रूपांतर मोठ्या प्रीमियर लीगमध्ये करणार – रुपेश पावसकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हुमरमळा प्रीमियर लीग 2026 (HPL 2026) या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले मंडळाचे सर्वच कार्यकर्ते यांना मी शुभेच्छा देतो. छोट्याशा गावामध्ये आपण स्पर्धा भरवून एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट आयोजन केले आहे, त्याला मी शुभेच्छा देतो._
पुढे बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली, “भविष्यात या छोट्या स्पर्धेचे रूपांतर मोठ्या स्पर्धेत व्हावे, यासाठी मी तुमच्या पाठीमागे सदैव राहणार आहे. त्यासाठी मोठी एक जिल्हा स्तरीय स्पर्धा आपण भरवूया. एक चांगले ग्राउंड तयार करूया, जेणेकरून सिंधुदुर्गातील, मुंबईतील खेळाडू येथे येतील. यासाठी लागणारे माझे सहकार्य तुम्हाला सदैव राहील.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अतुल बंगे, सरपंच अमृत देसाई,सुमित केसरकर, मंदार वालावलकर,मनोज देसाई,शरद वालावलकर, बाबू पारकर, शानू पारकर,मितेश वालावलकर,मयुर प्रभू आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते