चेंदवण नं. १ जिल्हा परिषद शाळेला राष्ट्रपुरुषांचे १० फोटो भेट; चेंदवणकर कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम!

चेंदवण : जिल्हा परिषद शाळा चेंदवण नं. १ येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांच्या विचारांची आणि कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री. गौतम दत्ताराम चेंदवणकर यांच्या कुटुंबीयांकडून शाळेला राष्ट्रपुरुषांचे १० फोटो भेट देण्यात आले.

या उपक्रमातून शाळेच्या शैक्षणिक वातावरणात राष्ट्रपुरुषांच्या विचारांना आणि प्रेरणादायी कार्याला स्थान मिळणार आहे. विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती मिळण्यास या भेटीचा निश्चितच उपयोग होणार आहे.

यावेळी गावचे सरपंच मा. वैभव चेंदवणकर, उपसरपंच तेंडुलकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण शृंगारे, सौ. शिल्पा चेंदवणकर, माजी सरपंच धुरी मॅडम, बाळू कोचरेकर, बाळा धुरी, अण्णा भरडकर आणि तलाठी नेरकर यांची उपस्थिती होती.

या फोटो भेटीसाठी श्री. गौतम चेंदवणकर, सौ. शिल्पा चेंदवणकर, श्री. सुनील चेंदवणकर, श्री. प्रभाकर चेंदवणकर आणि श्री. अमित चेंदवणकर यांनी योगदान दिले.

या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत आहे.