मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंत्री नितेश राणेंची गती; जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा!

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आज मत्स्यव्यवसाय विभागाच्या सर्व प्रादेशिक उपयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडून जिल्हानिहाय योजनेच्या प्रगतीचा मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी प्रत्येक जिल्ह्यानुसार योजनेची सद्यस्थिती, मंजूर प्रकरणे, लाभार्थ्यांची संख्या, प्रलंबित प्रस्ताव, मत्स्यतलावांची उपलब्धता तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी यांची तपशीलवार माहिती घेतली.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तालुका आणि गावपातळीवर विशेष कॅम्प आयोजित करावेत. या कॅम्पच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी, महिला बचतगट, युवक तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित उद्योजकांना योजनेची पात्रता, उपलब्ध घटक, अनुदानाचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधितांना दिले.