कोकणच्या आरोग्य सुविधांसाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक; राणे बंधूंचा पुढाकार!

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ यांच्या दालनात आयोजित बैठकीत कोकणातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर आमदार निलेश राणे तसेच मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढील कार्यवाहीचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.