शिवडी–लालबागच्या प्रश्नांना मिळणार तोडगा?; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : शिवडी–लालबाग परिसरातील नगर विकास व गृहनिर्माण विभागाच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य सचिव – गृहनिर्माण श्री. असीमकुमार गुप्ता यांच्यासोबत मुंबई येथील एसआरए कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात आले. संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक श्री. नाना आंबळे, श्री. अनिल कोकीळ, श्री. बबन कानावजे यांच्यासह संबंधित नागरिक उपस्थित होते.