भूजल पातळी वाढवण्यासाठी मळगावात ‘जलतारा’; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

मळगाव : येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याचे उद्घाटन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात पाणी संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.