परळ–भायखळ्यातील घटनांची आमदार निलेश राणेंकडून दखल; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा!

मुंबई – भायखळा : परळ येथील ‘लक्ष्मी कॉटेज’ आणि भायखळा येथील ‘माझगावचा मोरया’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी इतर धर्मातील व्यक्तींकडून हिंदूंना त्रास देण्याचे प्रकार घडले आणि तिथे दंगलही उसळली. या दोन्ही ठिकाणच्या घटनांची सविस्तर माहितीआमदार निलेश राणेंच्या माध्यमातून घेण्यात आली असून, या प्रकरणात दोषी असलेल्यांना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी ‘माझगावचा मोरया’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिली .यावेळी माजी आमदार श्री. दगडू दादा सकपाळ, दक्षिण मुंबई सह-प्रमुख श्री. संतोष नलावडे, माजी नगरसेवक श्री. नाना आंबोलकर, श्री. बबन कणवजे, शिवसेना विभागप्रमुख श्री. शशी निकम, भायखळा शिवसेना विभागप्रमुख श्री. विजय लिपरे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि गणेशभक्त उपस्थित होते.