सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत चिवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी एक सप्टेंबरला स्वच्छ करण्यात येणार आहे. या कामामुळे टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये २ व ३ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकोंडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकिलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वज़रवाडी, नाडकर्णी पाणंद तसेच चराठा ग्रामपंचायत या भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठ्यातील या तात्पुरत्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केले आहे.












