मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिंधुदुर्गातील वनविभागाशी निगडित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्राशी संबंधित प्रश्न, स्थानिक पातळीवरील अडचणी तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने बैठकीत विचारविनिमय झाला.
या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार दीपकजी केसरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव यांच्यासह वन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर झालेल्या या बैठकीमुळे स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांच्या अपेक्षा वाढल्या असून, चर्चेत आलेल्या प्रश्नांवर आगामी काळात ठोस कार्यवाही होण्याची शक्यता आहे.












