स्वातंत्र्यदिनी कुडाळ शहरात माजी सैनिकांच्या हस्ते होणार भव्य वृक्षारोपण मोहीम;
नगरसेवक मंदार शिरसाठ व शिवसेना कुडाळ शहराचा उपक्रम:
कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहरामध्ये ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा सामाजिक संदेश देत भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजक तथा नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हा मुख्य कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता विठ्ठलवाडी क्रीडांगण (तहसीलदार मैदानाशेजारी) येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रमासोबतच कुडाळ शहरातील इतर विविध ठिकाणी देखील वृक्षारोपण केले जाणार आहे.”देशासाठी बलिदान, पर्यावरणाचे रक्षण” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित केलेल्या या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि कुडाळ शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाठ आणि शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील : दिनांक: १५ ऑगस्ट
वेळ : सकाळी ठीक ११:००वाजता
मुख्य ठिकाण : विठ्ठलवाडी क्रीडांगण (तहसीलदार मैदानाशेजारी), कुडाळ शहर.












