मालवण : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगावकर्स मालवण टेबल टेनिस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे ११, १३ व १५ वर्षांखालील मुले, मुली, महिला, पुरुष आणि पुरुष दुहेरी अशा गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शुक्रवार, १३ नोव्हेंबरपर्यंत हेमंत वालकर-९४२२६३२६८६, विष्णू कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












