सावंतवाडी : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील अथायु मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय यांच्यावतीने रविवार १५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी शहरात मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे. शिबीर सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उभाबाजार येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात घेतले जाणार आहे, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.
या शिबिरात अथायु मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.
शिबिरात येणाऱ्या रुग्णांनी रेशनिंग कार्ड, आधारकार्ड प्रधानमंत्री आयुष्मान महात्मा फुले जीवनदायी जनआरोग्याचे कार्ड सोबत घेऊन यावे, यापूर्वी आपण डॉक्टरांकडून रिपोर्ट सुरू असलेले औषध घेऊन तपासणी केलेले आरोग्य तपासणीचे यावे. ईसीजी व रक्तचाचणी मोफत केली जाणार आहे.
या शिबिरामध्ये तपासणीमध्ये निदान झालेल्या रुग्णांची हृदयविकार, बायपास सर्जरी, हृदयाची एन्जोप्लास्टी, हृदयाला पेसमेकर, हृदयाला वॉलची शस्त्रक्रिया, व्हेरिकोज व्हेन्स, हाडांची शस्त्रक्रिया, मुतखडा, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, प्रोस्टलची शस्त्रक्रिया, मणक्याची व मेंदूची शस्त्रक्रिया, कॅन्सरची शस्त्रक्रिया अथायू मल्टीस्पेशालिस्ट कोल्हापूर येथे मोफत होणार आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना औषधे व अथायु हॉस्पिटलमध्ये जेवण मोफत दिले जाणार आहे.
या शिबिराचा सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर (९४२२४३५७६०) येथे नावे नोंदवावीत.












