चिरणीत सैनिकांसोबत दिवाळीचा आनंद! आमदार प्रमोद जठारांचा आजी-माजी सैनिकांशी स्नेहसंवाद!

खेड : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांच्या शौर्याला सलाम आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खेड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिरणी येथे आजी-माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाच्या नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात युद्धभूमीवरील शौर्यकथा, सैन्यदलातील अनुभव, देशाच्या सुरक्षेचे प्रश्न आणि मोदी सरकारच्या संरक्षणविषयक निर्णयांवर मनमोकळी चर्चा रंगली.
चिरणी गावाला देशसेवेची गौरवशाली परंपरा लाभली आहे. गावातील अनेक सुपुत्रांनी भारतीय सैन्यदलात विविध पदांवर कार्यरत राहून देशाच्या सीमांचे रक्षण केले आहे. काहींनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर शौर्य गाजवले, तर अनेकांनी प्रदीर्घ सेवेतून राष्ट्राच्या संरक्षणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अशा देशसेवकांशी संवाद साधत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ऑन. कॅप्टन संजय अनाजी आंब्रे, सुभेदार अंकुश चाळके, कॅएन शशिकांत कदम, हवालदार गंगाधर पांडुरंग आंब्रे, हवालदार रामचंद्र शिवराम आंब्रे, हवालदार सुरेश विश्राम चाळके, हवालदार शशिकांत शांताराम आंब्रे, हवालदार स्वप्रील शशिकांत आंब्रे, हवालदार नंदकुमार चाळके, हवालदार जाहिंद्र भागोजी आंग्रे, हवालदार विश्वास भागोजी आंबे, हवालदार अनंत दामाजी आंब्रे, हवालदार सुभाष सदाशिव आंन्ने तसेच माजी सैनिक लक्ष्मण भाऊ आंब्ने यांच्या पन्नी श्रीमती जयश्री लक्ष्मण आंबे यांच्यासह गावातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
या मेळाव्यात सैनिकांनी आपल्या सेवाकाळातील अनेक अनुभव आणि युद्धभूमीवरील धरारक प्रसंग कथन केले. प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी बजावलेली कामगिरी, युद्धभूमीवरील आव्हाने सैनिकांची शिस्त, जिद्द आणि राष्ट्रनिष्ठा यांचे अनुभव ऐकताना उपस्थित भारावून गेले. आमदार प्रमोद जठार यांनीही सैनिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या देशसेवेच्या आठवणी जाणून घेतल्या.
विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित माजी सैनिक आणि युवा सैनिकांनी देशाच्या संरक्षणविषयक धोरणांमधील बदलांवर भाष्य केले. २०१४ पूर्वी सैन्यदलाच्या निर्णय प्रक्रियेवर असलेली बंधने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सैन्यदलाला दिलेले निर्णयस्वातंत्र्य यातील फरक त्यांनी अधोरेखित केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रसंगी योग्य निर्णय घेण्याचे अधिकार आणि कारवाईसाठी मिळालेली मोकळीक यामुळे सैन्यदलाचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त करत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले.
आमदार प्रमोद जठार यांनी सैनिकांच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, देशाचे जवान स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र सीमेचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सुरक्षित वातावरणात सण-उत्सव साजरे करू शकतो. सैनिकांचा त्याग आणि देशाप्रती असलेली निष्ठा अनमोल आहे. आजी-माजी सैनिकांचा सन्मान करपणे आणि त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दरम्यान, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजी-माजी सैनिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ वैयक्तिक स्वरूपात न साजरा करता देशासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांसोबत साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते राजूभाई रेड्डीज, खेल तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांच्यासह चिरणी गावातील ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिकांच्या शौर्याचा गौरव, त्यांच्या अनुभवांना उजाळा आणि देशसेवेोप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवाळी फराळ सेहमेळावा चिरणीच्या सैनिक परंपरेचा अभिमान उंचावणारा ठरला.