दोडामार्ग : मिनी टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दौघा चुलत भावांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दौडामार्ग शहरातील स्नेह रेसिडेन्सीसमोर घडली. राजकुमार सोनेलाल यादव (वय ३०) आणि जोहरी रामअवतार यादव (वय ३१, दोघेही रा. अरवल, ता. हरलापूर, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) अशी मृत युवकांची नावे आहेत.
राजकुमार यादव आणि जोहरी यादव है सोमवारी सकाळी दुचाकीने दोडामार्गहून मेढेच्या दिशेने जात होते. याचवेळी समोरून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या मिनी टेम्पोशी स्नेह रेसिडेन्सी येथील वळणावर त्यांच्या दुचाकीची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. अपघातानंतर घटनास्थली नागरिकांनी मोठी गर्दी केली. दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने बाहतुकीवर परिणाम झाला. उपस्थित नागरिकानी तत्काल बचावकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन्ही युवक रोजगाराच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून दौडामार्ग शहरात बास्तव्यास होते. ते एका फरशी बसविणाऱ्या कारागिराकडे काम करत होते. दिवाळीच्या काळात है काम बंद असल्याने त्यांनी पेंटिंगचे काम करणाऱ्या दुसऱ्या कारागिराकडे काम सुरू केले होते. शनिवारपासून ते या कामावर रुजू झाले होते. मेंढे येथे पेंटिंगच्या कामासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जौहरी यादव याला तीन लहान मुले असून, दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












