✅ आमदार प्रमोद जठार यांनी घेतले श्री देव पाटेश्वराचे दर्शन । Kokanshahi ।

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – सावंतवाडी : श्रावण सोमवारनिमित्त आमदार प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री देव पाटेश्वर देवस्थानाला भेट देत श्री देव पाटेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.

श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व असून, या निमित्ताने श्री देव पाटेश्वर मंदिरात भक्तांची मोठी उपस्थिती होती. आमदार प्रमोद जठार यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि भक्तिभावाने पूजा केली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संतोष साखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ अध्यक्ष सुधीर आदिवरेकर, मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, इपाली भालेकर, मधुसूदन देसाई, संतोष राऊळ आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रमोद जठार यांनी श्रावण सोमवारच्या पवित्र पर्वावर श्री देव पाटेश्वराचे दर्शन घेतल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.