कणकवली येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालत
संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि मा. नामदार उच्च न्यायालय, मुंबई व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदूर्ग ओरोस यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय, कणकवली येथे शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या पक्षकारांना मा. दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, कणकवली यांचे न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी कडील न्यायीक प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बैंक, स्वायत्त संस्था ग्रामपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती कणकवलीकडे दाखल करावीत.
ज्यांना त्यांची प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन मा. दिवाणी न्यायाधीश, कणकवली तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कणकवलीी मा. श्री. एस.जी.लटुरिया यांनी केले आहे.












