पुणेः देशात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढणार असून, आधीच हॉट स्पॉट ठरलेल्या विदर्भातदेखील पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे आतापर्यंत या मागात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे, तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बऱ्याच
ठिकाणी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी वर्ध्यात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांश भागात दुपारनंतर वादळी पाऊस होत आहे पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी गारपीट झाली. दक्षिण कोकण, जळगाव, नाशिक, नगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली जिल्हयांत पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळीचा प्रभाव राहणार आहे

देशभर उष्णतेची लाट
दुसरीकडे देशाच्या अनेक राज्यात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यात गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश,
तामिळनाडू केरळ, विदर्भ, कोकणात उष्णतेची लाट तसेच दमट हवामानाच इशारा देण्यात आला आहे. २७एप्रिलयपर्यंत देशभर उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्यानंतर देशातील तसेच विदर्भातील उष्णतेची लाट ओसरणार आहे राज्यात २५ एप्रिलयपर्यंत अवकाळीचा प्रभाव राहणार आहे. यात विदर्भात यांची तीव्रता कमी असली तरी तळकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात २५ एप्रिलपर्यंत पाऊस कायम राहील, दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा मारा होणार
असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे कोकणात विशेषत मुंबई, ठाणें रायगडमध्ये उष्ण व दमट हवामान पुढील दोन दिवस राहील,
पुण्यात गारांचा पाऊस
पुण्यात मध्यवर्ती भागात बुधवारी दुपारनंतर गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे वातावरणात गारवा पसरला. पुणे व शहर परिसरात गेले काही दिवस पारा वाढला आहे. ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान गेल्याने पुणेकर हैराण झाले असतानाच बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे यातून दिलासा मिळाला











