सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेत पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने व्यापारी, नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित ठेकेदार कंपनीने काही दिवसांपूर्वी सिमेंट काँक्रीट टाकून काही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसामुळे हे काँक्रीट वाहून गेल्याने दुरुस्तीचा कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका महिलेला खड्ड्यामुळे अपघात होऊन दुखापत झाली. अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावर खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.फोंडाघाट बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
फोंडाघाट बाजारपेठेत खड्ड्यांचे साम्राज्य, व्यापारी व वाहन चालक त्रस्त, संबंधित ठेकेदार कंपनीने सिमेंट काँक्रीट टाकून काही खड्डे बुजवण्याचे काम केले पण पुन्हा पाऊस पडल्याने ते काँक्रीट वाहून गेले त्यामुळे नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालक तसेच बाजारपेठेतील नागरिक व्यापारी त्रस्त झाले आहेत लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे गेले नाही तर आम्ही आंदोलन करणार असल्याचा पवित्रा देखील काही नागरिकांनी घेतला आहे












