सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष व कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग सदस्य श्री संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पियाळी यांच्या वतीने पियाळी गावातील सर्व भजनी मंडळांना भजनी साहित्याचे व महिला फूगडी मंडळाना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष व कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग सदस्य श्री.संतोष कानडे, पियाळी ग्रामपंचायत सरपंच श्री. प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच श्री. विजय मुरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय ढवण, सौ.तन्वी गुरव, सौ. अपर्णा कावले, माजी सरपंच व तंटामुक्ती समिती पियाळी अध्यक्ष श्री. दामोदर नारकर, माजी उपसरपंच श्री. बाळा करमळकर कासार्डे पियाळी विकास सोसायटी व्हाईस चेअरमन श्री.बाबू घाडी, श्री. सुनील तेली, वाडी प्रमुख श्री. शरद नारकर श्री. चंद्रकांत वंजारे श्री. यशवंत तेली श्री. संदीप मुरकर तसेच गावातील सर्व भजनीबुवा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.












