सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशालभाईंची ‘क्रेज’; लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे नेतृत्व!

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे युवा नेते विशालभाई परब यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून मतदारसंघातील गणेशभक्तीला सुरुवात केली आहे. गावागावात घरोघरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेत असतानाच नागरिकांशी संवाद साधण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

यावर्षी तब्बल २ हजार गणेश दर्शनाचा संकल्प विशालभाई परब यांनी केला असून, त्यानुसार मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन ते गणरायाचे दर्शन घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे लहान मुलांमध्ये विशालभाईंची दिसून येणारी क्रेज!

गणेश दर्शनासाठी विशालभाई परब गावात पोहोचताच अनेक लहान मुले त्यांच्याभोवती गर्दी करताना दिसत आहेत. विशालभाईंसोबत फोटो काढण्याचा मोह या चिमुकल्यांनाही आवरत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशालभाईंचा लहानग्यांशी असलेला जिव्हाळा आणि त्यांच्यातील लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

विशेष म्हणजे केवळ युवा वर्ग किंवा लहान मुलेच नव्हे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही विशालभाई परब यांच्याबद्दल आपलेपणाची भावना दिसून येत आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत, सर्वांच्या मनात आपली जागा निर्माण करणारा नेता म्हणून विशालभाई परब यांची हीच लोकप्रियता सावंतवाडी मतदारसंघात नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

वरील बातमीतील महत्वाचे 5 मुद्दे वापरून 9 बाय 16 साईज मध्ये पोस्टर डिझाईन करून द्या.. सेल्फी चा फोरो महत्वाचा आहे यातील.. कोकणशाहीचा logo उजव्या कोपऱ्यात घ्या.. त्यात काही बदल करू नका..