मुलुंडात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन! आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशांचा वर्षाव

मुंबई : मुंबईतील मुलुंड येथे शिवसेना मुलुंड विधानसभा आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, आमदार निलेश राणेंनी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी वाटचाल, एस.आय.आर. मतदार पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार श्री. संजयजी पाटील, विधानपरिषद आमदार श्री. रवींद्रजी फाटक, भांडुपचे आमदार श्री. अशोकजी पाटील, शिवसेना सचिव श्री. संजय म्हशीलकर, कॅ. श्री. अभिजीत अडसूळ, उपनेते श्री. आनंद जाधव, विभागप्रमुख श्री. जगदीश शेट्टी, माजी नगरसेविका सुजाता पाटक, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, अश्विनी साळवी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.