देवगडमध्ये कामगाराचा हृदयद्रावक अंत; काम करतानाच कोसळला

देवगड : तालुक्यातील कट्टा येथील “घाडणीचे पाणी” परिसरातील एका घरात कपाटाचे काम करीत असताना गुल्लाराम हिरालाल डोगीवालो (४५, मूळ रा. जयपूर- राजस्थान, सध्या रा. जामसंडे शिळोम) हा अचानक जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना रविवारी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टा येथील ‘घाडणीचे पाणी परिसरात रुद्रेश सखाराम बांदेलकर यांचे घर आहे. त्यांच्या घरात गुल्लाराम डोगीवालो है रविवारी दुपारी मार्बलचे कपाट तयार करण्याचे काम करत होते. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करत आहेत.