कणकवलीला नवे भाजी मार्केट मिळणार? महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदन


माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन केले सादर


संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : या जागेचे नगरपंचायतीकडे वर्गीकरण व्हावे, अशी मागणी करत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी नगरसेविका सौ. मेघा गांगण, अण्णा कोदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली शहरातील जुने भाजी मार्केट परिसरातील महसूल विभागाच्या मालकीची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी अधिकृत निवेदन सादर करत, ही जागा नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यास भाजी मार्केटचा विकास, नियोजनबद्ध सुविधा आणि व्यापाऱ्यांसाठी अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होतील, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनानुसार, कणकवली शहरातील पटवर्धन चौक परिसरातील सुमारे ०.०७ हेक्टर महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत नगरसेविका सौ. मेघा गांगण, अण्णा कोदे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.