महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे केले स्वागत
संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरकारच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिराचे महसूल विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली तहसील कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव देवगड प्रसाद कुलकर्णी, प्रांतिक सदस्य विलास गावकऱ्,आदी उपस्थित होते












