मंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन

मालवण : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते मालवण येथील पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.