

सिंधुदुर्ग :
भाजपचे महाराष्ट्र सहप्रभारी सदानंद तानवडे आणि कोकण विभाग सहसंयोजक संजय वाघुले यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘कमळ’ हेच आपले एकमेव ध्येय मानून सर्वांनी एकदिलाने काम करावे. आगामी काळात पक्षाने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे महाराष्ट्र सहप्रभारी श्री. सदानंद तानवडे, सहसंयोजक भा.ज.पा. कोकण विभाग मा.संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत आदी उपस्थित होते.












