बांदा : धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त बांदा येथील नट वाचनालयात आदिवासी स्वातंत्र्यसेनानी जनजाती गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रा. एस. व्ही. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक हेमंत मोर्ये यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ब्रिटिश राजवटीविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून त्यांनी दिलेला लढा, सामाजिक जागृतीसाठी केलेले कार्य आणि जनजाती समाजाच्या हक्कांसाठी उभारलेला संघर्ष यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित संचालक नीलेश मोरजकर, राकेश केसरकर, हेमंत मोर्ये, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, नागेश सावंत, गुरुनाथ नार्वेकर, सुधीर साटेलकर, अर्चना सावंत, हेमंत खानोलकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सावित्री नाईक, कर्मचारी मिताली सावंत आणि मिलिंद महाजन आदी उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












