फेब्रुवारी-मार्चनंतरही सिंधुदुर्गात पाणीटंचाई नको! पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

सिंधुदुर्ग :
दुष्काळ टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा आणि आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठकीत फेब्रुवारी-मार्चनंतरही जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.