महाराष्ट्राच्या सागरी विकासाला नवी गती! मंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८९ वी बैठक आज बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेशात वॉटर मेट्रो सुरू करणे, दिघी, रायगड येथे पाईल जेट्टीचे बांधकाम करणे तसेच मासळी उतरवण्याच्या केंद्रावर मच्छीमारांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे, रेवस येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम, अलिबाग येथील मानकुळे येथील धरमतर खाडीकिनारी शिपयार्ड प्रकल्प उभारण्याकरिता मे.शिपटेक मरीन सोल्युशन कंपनीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत, पनवेल येथील खाडीमध्ये बहुउद्देशीय जेट्टी प्रकल्प उभारणेकरिता मे.फेमस ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांना दिलेल्या इरादापत्रास मुदतवाढ देणेबाबत, NW 10,91 आणि 83 या राष्ट्रीय जलमार्गांवर VTMS केंद्र उभारण्यासाठी IWAI ला जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या परवानगीस कार्योत्तर मंजुरी प्रदान करणे, वर्सोवा ते मढ आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या जलमार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी MMB मार्फत रो पॅक्स बोट आणि स्पीड बोट खरेदी करणेबाबत, नाबार्ड अर्थसहाय्यित FIDF व RIDF योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या मत्स्यबंदरांच्या कामाबाबत बैठकी सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील सागरी वाहतूक, बंदरे आणि किनारी पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देऊन महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी राज्य बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, निमंत्रित सदस्य तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.