- प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण, पक्षविस्तार तसेच आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, गिरीष महाजन, जयकुमार गोरे, मंगलप्रभात लोढा, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, अतुल सावे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि माध्यम प्रमुख गोविंद येत्येकर यांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, संघटनेची व्याप्ती वाढविणे, कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करणे आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत राज्यातील भाजपाच्या आगामी संघटनात्मक आणि राजकीय नियोजनाबाबत चर्चा झाल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












