बंदर विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य; मंत्री नितेश राणेंची ग्वाही

मुंबई : राज्यातील बंदरे विभागाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्ससोबत आज महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (MMB) बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी या बैठकीत राज्यातील बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, बंदरांशी संबंधित नियामक बाबी, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बंदर संचालकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., पोर्ट ऑपरेटर्स व संबंधित अधिकारी उपस्थित होते.