सिंधुदुर्गात चारा व्यवस्थापनाचा नवा प्रयोग! सुका चारा जाळण्याऐवजी होणार प्रक्रिया; मंत्री नितेश राणेंचा पुढाकार!

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा चारा व्यवस्थापन कृती दल संदर्भात चितळे ग्रुप समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यात उपलब्ध असलेला सुका चारा जाळण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी उपयुक्त बनविणे, तसेच निर्यातीच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्याबाबत चर्चा केली.मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्ह्यातील सुका चारा योग्य पद्धतीने संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषद व प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे. ऊस लागवडीसोबत मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन चारा व्यवस्थापनाचे शाश्वत नियोजन करण्यावर बैठकीत भर दिला.
बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते. चितळे ग्रुपचे गिरीश चितळे ऑनलाइन सहभागी झाले.