पालकमंत्री नितेश राणे व आमदार श्री निलेश राणे यांच्या प्रयत्नातून तसेच मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या पाठपुराव्यामुळे,मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून गेली 15 वर्षे विनवेतन काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक यांना मान्यता…….
सिंधुदुर्ग : गेली 15 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी लिपिक भरती प्रक्रिया बंद होती दिनांक 4 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेस मान्यता मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही संस्थांनी कनिष्ठ लिपिक भरती प्रक्रिया राबवून माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मान्यतेस्तव प्रस्ताव सादर केले होते. परंतु 28.05. 2025 च्या संचालकांच्या आदेशाने सदरच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याशी पाठपुरावा करून सदरचा स्थगितीचा आदेश रद्द करण्याबाबतचे शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले तसेच मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून लिपिक मान्यतेचा प्रश्न निकाली निघाला. पालकमंत्री श्री नितेश राणे ,आमदार श्री निलेश राणे, माजी आमदार अजितराव गोगटे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री दादा साईल ,शिक्षण सभापती श्री प्रितेश राऊळ गटनेता श्री केशव नारकर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे सर यांच्या सहकार्यातून सदरच्या मान्यता पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. मान्यता मिळाल्यानंतर गेली 15 वर्षे विनवेतन काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले पाहायला मिळाले.
मान्यता मिळविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी,संघटना पदाधिकारी यांचे मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटना अध्यक्ष दिनेश म्हाडगुत सर यांनी आभार मानले.











