सिंधुदुर्ग: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवधा महाराष्ट्र पोरका झाला आहे. अशा शब्दांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नितेश राणे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना उजाळा दिला. अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा आणि शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस अशी नाना पाटेकर यांची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
क्रांतिवीर पासून ‘नटसम्राट पर्यंत आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटविणारा हा राष्ट्रभक्त कलाकार आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया नितेश राणे यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर हे केवळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नव्हते. तर सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांचे योगदान मोठे होते, असे सांगत त्यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून न निघणारी असल्याच्या भावना नितेश राणे यांनी व्यक्त केल्या











