चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादा भुसे यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्ग : चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी सकाळी कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या वतीने मा. ना. दादाजी भुसे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना प्रा.डाॅ.श्रीधर पेडणेकर साहेब (ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष) श्री. दादा साईल साहेब (उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तथा शिवसेना सचिव) श्री रत्नाकर जोशी (जिल्हा प्रवक्ता)

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध!