कुडाळ : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी मा. ना. दादाजी भुसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडुलकर, विजय जाधव आणि कुमार राठोड यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दादाजी भुसे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील शाळांच्या विविध गरजा तसेच शिक्षण क्षेत्रातील आवश्यक बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
युवासेना सिंधुदुर्गकडून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
— युवासेना सिंधुदुर्ग 🚩











