बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेली रक्ताची टंचाई कमी करण्यासाठी माऊली बॉईज कळणे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रविवारी १६ ऑगस्टला कळणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माऊली बॉईज कळणे व ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
जिल्ह्यात वाढत्या रक्तटंचाईची समस्या लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी बाळानंद देसाई (७५८८५७००६७), संकेत देसाई (८६९८२६०१४४), सिद्धू परब (८०८०९९९३८२) आणि सुहास देसाई (९६७३१५६८२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.












