
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरातील गौसिया चाळ येथे मध्यरात्री दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना आमदार निलेश नारायण राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच दरडीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुखरूप सुटका व्हावी आणि बचावकार्याला यश मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, तसेच बचाव पथकांच्या प्रयत्नांना यश मिळून अधिकाधिक नागरिकांचे प्राण वाचावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आमदार निलेश राणे यांनी केली. दरम्यान, दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग देण्यात आला असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रशासन आणि बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.












