नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांचा स्तुत्य उपक्रम;स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या शुभहस्ते होणार भव्य वृक्षारोपण!

कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या शुभहस्ते कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता संपन्न होणार आहे.देशासाठी बलिदान आणि सेवा देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या वर्षीचे वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा संदेश देत कुडाळ शहरातील विविध प्रमुख आणि सार्वजनिक ठिकाणी ही वृक्षलागवड केली जाईल.या कार्यक्रमाला कुडाळ शहर शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी कुडाळमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आणि देशप्रेमी जनतेने या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा संक्षिप्त तपशील:
दिनांक: १५ ऑगस्ट
वेळ : सकाळी १०:३० वाजता