मंत्री नितेश राणे यांचे प्रभावी मार्गदर्शन; वैभववाडीत हिंदुत्व विचारांची सभा रंगली । Kokanshahi ।

वैभववाडी : ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने आज वैभववाडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारसभेचे आयोजन करण्यात आले. या विचारसभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

या सभेत मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्व, राष्ट्रभावना आणि सामाजिक एकात्मतेवर भाष्य केले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा आजच्या काळातही महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.

कार्यक्रमात अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनीही आपल्या ओजस्वी शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सावरकरांच्या विचारांचा सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सोहम काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांद्वारे समाजात एकात्मता वाढवण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवला जाईल, असे सांगितले.

कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.