कणकवली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क मिळालेला आहे. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी मी नतमस्तक झालो. आपला देश, राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर सदैव चालत राहणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली येथील बुद्ध विहार येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच बुद्ध विहार मधील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी घोषणा देण्यात आली .
यावेळी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,माजी नगरसेवक संजय कामतेकर , विराज भोसले , तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत ,औदुंबर राणे , गौतम खुडकर, किशोर राणे, राकेश राणे , संतोष पुजारे , निसार शेख , अंकुश कदम, सुशील कदम , मयुरी चव्हाण , मेघा सावंत , आर्या राणे, प्रतीक्षा सावंत , मनस्वी ठाणेकर , किरण जाधव, पप्पू पुजारे, नितीन पवार, प्रथमेश धुमाळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणशाही कणकवली












