कुडाळ : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-३ (सन २०२५-२६) या अभियानात शिवाजी विद्यालय, हिर्लोक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत हॅट्रिक साधल्यानंतर जिल्हास्तरावर सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याची कामगिरी शाळेने केली आहे.
या अभियानांतर्गत २०० गुणांचे सर्वंकष परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये पायाभूत सुविधा, सुसज्ज वर्गखोल्या, प्रशासकीय कार्यालय, आरोग्य सेवा, स्वच्छता व सुरक्षितता, शालेय फर्निचर, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणपूरक शाळा, क्रीडांगण व क्रीडा सुविधा, आयसीटी लॅब, शैक्षणिक साधनसामग्री, बाला अंतर्गत बोलक्या भिंती, परसबाग विकास, विविध विद्यार्थी लाभ योजना, आधार वैधता, महावाचन चळवळ, शासकीय समित्यांचे कार्य, विद्यार्थी सुरक्षा, विद्यांजली पोर्टल, पर्यावरण जनजागृती, विद्यार्थी अभिलेखांचे जतन, उल्हास अॅप, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना, मुख्याध्यापक व शिक्षकांची शैक्षणिक उपस्थिती, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील यश, विद्यार्थी उपस्थिती, भाषाविषयक क्षमता, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, ऐतिहासिक वास्तू जतन, अध्ययन संपादन पातळी तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होता.
या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शिवाजी विद्यालय, हिर्लोक हायस्कूलने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय सावंत, उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत नाईक, सेक्रेटरी दीपक नारकर, खजिनदार बाजीराव झेंडे, सहसेक्रेटरी पंढरीनाथ सावंत, संचालक नागेश आईर, नरेंद्र राणे, चंद्रकांत सावंत, योगेश परब, महादेव परब, रवींद्र देसाई, प्रकाश सावंत, सुधाकर सावंत तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ सरनोबत यांनी मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कोकणशाही कुडाळ











