कुडाळ तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे. महायुतीकडून रुपेश कानडे रिंगणात उतरले असून, त्यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार उभे आहेत. मात्र या लढतीत उबाठा सेनेचे रमाकांत ताम्हणेकर हेच कानडे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मानले जात आहेत.
रुपेश कानडे यांना सत्ताधारी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा फायदा मिळत आहे. महायुतीची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे कानडे यांची बाजू सुरुवातीपासूनच मजबूत दिसून येते. या निवडणुकीत कानडे यांना आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याने प्रचाराला वेग आला आहे. राणेंच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, सत्तेच्या माध्यमातून विकासकामांचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुपेश कानडे यांचा दांडगा जनसंपर्क हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान ठरत आहे. गावोगावी प्रत्यक्ष भेटी, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि सातत्याने मतदारांशी संपर्क यामुळे त्यांची पकड मतदारसंघात भक्कम असल्याचे चित्र आहे. उबाठा सेनेचे रमाकांत ताम्हणेकर हे मुख्य विरोधक असले तरी, अपक्ष उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची एकसंघ ताकद उभी राहण्यात मर्यादा दिसून येत आहे. एकूणच, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार, आमदार निलेश राणेंकडून मिळणारी ताकद, भक्कम संघटन आणि दांडगा जनसंपर्क या सर्व कारणांमुळे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात रुपेश कानडे अंतिम प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. मात्र अंतिम कौल मतदानाच्या दिवशीच ठरेल, तरी सध्याच्या परिस्थितीत कानडे यांची बाजू अधिक मजबूत मानली जात आहे.
साईनाथ गांवकर – कोकणशाही – माणगाव












