डॉ. तन्मय आठवले यांना ISAKOS संस्थेचे मानद सदस्यत्व

देवगड – देवगड मेडिकल फाऊंडेशनचे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या जागतिक दर्जाच्या संस्थेचे मानद सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल डॉ. आठवले यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

भारतामध्ये आतापर्यंत केवळ ५९ ऑर्थोपेडिक सर्जन यांना या जागतिक संस्थेचे सदस्यत्व मिळाले आहे. या प्रतिष्ठित यादीत डॉ. तन्मय आठवले यांचे नाव समाविष्ट होणे हे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाची, कौशल्याची आणि संशोधनात्मक कार्याची मौल्यवान दखल मानली जात आहे.

डॉ. आठवले हे देवगड मेडिकल फाऊंडेशनमध्ये कार्यरत असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरोग क्षेत्रातील विविध संघटनांमध्ये महत्त्वपूर्ण सदस्यत्व मिळवले आहे. तसेच, त्यांनी अस्थिरोग विषयक अनेक संशोधनपत्रे नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधन आणि क्लिनिकल कार्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध होत असून त्यांच्या कार्याची व्यापक पातळीवर प्रशंसा होत आहे.

या विशेष यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकारी, विद्यार्थी तसेच रुग्णांनी डॉ. तन्मय आठवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकणशाही देवगड